मुंबई - नागराळ मंजुळे यांच्यासोबत 'नाळ' चित्रपटात झळकलेला बालकलाकार 'चैत्या' म्हणजेच श्रीनिवास पोकळे सर्वांना आठवत असेलच. आपल्या गोड हास्याने आणि निरागसतने चैत्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा तो तेलुगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणरा आहे. 'जॉर्ज रेड्डी' असं या तेलुगू चित्रपटाचं नाव आहे.
श्रीनिवास या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी त्याने तेलुगू भाषेचे प्रशिक्षणही घेतले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.
- View this post on Instagram
#shripokale ,#marathifilm ,#marathiactors ,#chaitya ,#georgereddy ,#georgereddytrailer
">
हेही वाचा -'मिर्झापूर २' लवकरच येणार, पंकज त्रिपाठींनी दिली हिंट
'नाळ' चित्रपटातील चैत्याच्या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटामुळे तो लोकप्रिय झाला आहे. 'नाळ' नंतर त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनाही आतुरता आहे.
- View this post on Instagram
#shripokale ,#naalmovie ,#marathifilm ,#marathibigboss ,#marathiactors ,#childactors ,#chaitya
">
हेही वाचा -प्रतिभावंत कलाकार 'व्ही. शांताराम', ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूरांनी सांगितल्या आठवणी