मुंबई - मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शन क्षेत्रात उतरली आहे. तिने दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट 'व्हॅलेन्टाईन्स डे'च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 'मन फकीरा' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मृण्मयीने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून त्यावर खास कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट नातेसंबधावर आधारित असून आजची पीढी ज्या दृष्टीकोनातून नातेसंबंधाकडे पाहते, त्याबद्दलची कथा यामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा देखील मृण्मयीनेच लिहिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विशेष म्हणजे छोट्या पडद्यावर लोकप्रिय झालेले कलाकार या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची उत्सुकता आहे.
स्मिता विनय गनु, नितिन प्रकार वैद्य, ओम प्रकाश भट्ट आणि सुजय शंकरवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.