ETV Bharat / sitara

Box Office: 'मिशन मंगल'ची १०० कोटीकडे झेप, तर 'बाटला हाऊस'नेही गाठलं अर्धशतक

author img

By

Published : Aug 19, 2019, 12:55 PM IST

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. तरीही दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

Box Office: 'मिशन मंगल'ची १०० कोटीकडे झेप, तर 'बाटला हाऊस'नेही गाठलं अर्धशतक

मुंबई - मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. तरीही दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

अक्षय कुमारचा मल्टीस्टारर 'मिशन मंगल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. अवघ्या ३२ कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तीनच दिवसात ५० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. तर चौथ्या दिवशीही या चित्रपटाने २७ कोटींची कमाई करत ९७ कोटींची मजल मारली आहे. त्यामुळे या चित्रपटाचा आता १०० कोटी क्लबमध्येही समावेश होईल. हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

  • #MissionMangal sets the BO on 🔥🔥🔥... Springs a biggg surprise... Packs a fabulous total in its *extended* weekend... Metros superb, mass circuits join the party [on Sun]... Thu 29.16 cr, Fri 17.28 cr, Sat 23.58 cr, Sun 27.54 cr. Total: ₹ 97.56 cr. India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) August 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर, 'बाटला हाऊस एन्काऊंटर'चा थरार उलगडण्यात जॉन अब्राहमची टीम यशस्वी ठरली आहे. या चित्रपटानेही आपले अर्धशतक पूर्ण करत ५१ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी चुरस असुनही 'बाटला हाऊस'नेही प्रेक्षकांना निराश केले नाही. त्यामुळे एकाच दिवशी प्रदर्शित होऊनही चित्रपटांच्या कमाईचे आकडे पाहता दोन्हीही चित्रपट हिट ठरले आहेत, असेच म्हणावे लागेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.