बंगळूरू - दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या निधनाने त्याचे कुटुंबीय व चाहते यांना धक्का बसला होता. पण आज त्याच्याशी संबंधित एक चांगली बातमी आहे. खरं तर चिरंजीवी सरजा यांचे निधन झाले तेव्हा पत्नी मेघना राज गर्भवती होती आणि आज तिने एका मुलाला जन्म दिला आहे. चिरंजीवी आणि मेघना यांचा मुलगा आज बंगळुरुमधील खासगी रुग्णालयात जन्मला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इतकेच नाही तर मेघनाच्या मुलाचे छायाचित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात चिरंजीवीचा भाऊ ध्रुव सरजा यांनी मुलाला आपल्या हातात धरले आहे आणि चिरंजीवीच्या फोटोसह मुलाचा फोटो काढला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या आनंदाच्या क्षणी, कुटुंबातील प्रत्येकजण चिरंजीवी आज नाहीत याबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत. लोक हा फोटो शेअर करीत असून चिरंजीवी सरजा परत आला आहे' अशी भावना व्यक्त करीत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला मेघना राज चर्चेत आली तेव्हा तिच्या बेबी शॉवरची छायाचित्रे इंटरनेटवर प्रसिद्ध झाली होती. बेबी शॉवरचा सोहळा अगदी खास पद्धतीने पार पडला होता. या फोटोंमध्ये मेघना पती चिरंजीवीच्या कार्डबोर्ड कट-आउटबरोबर पोज करताना दिसली होती. चिरंजीवीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मेघनाने तिच्या पहिल्या मुलाची घोषणा केली.