वॉशिंग्टन - अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. कार्यक्रमातील अमेरिकी नागरिकांसह हजारो भारतीय नागरिकांनी पंतप्रधानांचे जल्लोषात स्वागत केले. अनेक दिवसांपासून एन.आर.जी. स्टेडीयमवर जय्यत तयारी करण्यात येत होती.
पंतप्रधानांच्या या कार्यक्रमासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास मराठमोळ्या पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले.
स्टेडियम मध्ये मोदींचे आगमन होताच ढोल-ताशे वाजवण्यास सुरुवात झाली. ढोल ताशांचे सूर कानी पडताच अनेकांना नाचण्याचा मोह आवरला नाही. तसेच यावेळी उपस्थीतांनी ढोल ताशावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. तसेच भाषण संपल्यानंतरही उपस्थित लोकांनी ढोल-ताशावर ठेका धरला.
हेही वाचा -'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'.. संपूर्ण ह्युस्टन मोदीमय !
मोदींनी उपस्थित सर्व नागिरकांना हात उंचावून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांमध्ये उत्साह संचारला. यादरम्यान, महात्मा गांधी यांच्या १५० जयंती निमित्त ‘वैष्णव जन’ हे भजन सादर करण्यात आले. भारतीय व अमेरिकी गायकांचा यामध्ये समावेश होता. या भजनाद्वारे महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
हेही वाचा -मी १३० कोटी भारतीयांच्या आदेशावर काम करणारा साधारण व्यक्ती - मोदी