ETV Bharat / sitara

२५०+ चित्रपटगृहे आणि ३०००+ स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला 'डार्लिंग' खेचतोय ‘हाऊसफुल’ गर्दी! - मराठी चित्रपट डार्लिंग महाराष्ट्रात हाऊसफुल्ल

चित्रपटरसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात समीर आशा पाटील दिग्दर्शित 'डार्लिंग' या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

'डार्लिंग' खेचतोय ‘हाऊसफुल’ गर्दी
'डार्लिंग' खेचतोय ‘हाऊसफुल’ गर्दी
author img

By

Published : Dec 14, 2021, 4:39 PM IST

सध्या हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहेत आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग’ हा मराठी चित्रपटही त्याला अपवाद नाही. 'डार्लिंग' या लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॅाक्स ऑफिसवर आज 'डार्लिंग'चाच बोलबाला आहे. चित्रपटरसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात समीर आशा पाटील दिग्दर्शित 'डार्लिंग' या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लॅाकडाऊनमुळं प्रेक्षकांच्या भेटीपासून दुरावलेला 'डार्लिंग' अखेर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये 'डार्लिंग'च्या गाण्यांवर रसिक अक्षरश: तल्लीन होऊन नाचत असल्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री या 'टकाटक' जोडीचा जलवा थिएटरमध्ये पुन्हा पहायला मिळत आहे. ‘अ स्ट्रेस बस्टर फॅमिली एन्टरटेनर’ ही 'डार्लिंग’ ची टॅगलाईन मराठी सिनेरसिकांनी खरी ठरवली आहे. 'डार्लिंग' मिळणाऱ्या प्रतिसादाचं संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या टिमनं रसिक मायबाप यांना दिलं आहे. २५० हून सिनेमागृहांमध्ये ३००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला 'डार्लिंग' पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. हडपसर, खर्डा, रहाटणी, नारायणगाव, तळेगाव, नाशिक, लातूर, नांदेड, अकलूज, अमरावती, खान्देश, चिंचवड, सोनाई, कामोठे, गोरेगाव, वाळूंज, औरंगाबाद, सिटिप्राईड अभिरूची येथे रविवारी हाऊसफुलचे बोर्ड झळकले. तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ताल धरायला लावण्याची क्षमता 'डार्लिंग'च्या गाण्यांमध्ये असल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे.

प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला निखिल चव्हाणनं साकारलेला राजभाऊही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातील काही तरुणांचं प्रतिनिधीत्व करणारा असल्यानं तोदेखील लक्ष वेधून घेत आहे. टायटलवरून जरी हा चित्रपट केवळ प्रेमकथा असल्यासारखा वाटत असला तरी मूळात हा फॅमिली एन्टरटेनर असल्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारं कथानक, पूर्वार्धात केलेली व्यक्तिरेखा आणि पटकथेची बांधणी, उत्तरार्धात त्याला जोडलेली इमोशनची किनार, तंत्रशुद्ध दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय, प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी केलेलं अचूक कास्टिंग, सुमधूर संगीत, नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये अशी एक ना अनेक कारणं 'डार्लिंग'ला चहू बाजूंनी परफेक्ट बनवणारी आहेत.

चित्रपटातील कलाकारांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आणि शहरांमध्ये जाऊन प्रमोशन करताना केलेल्या आवाहनाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानं ५० टक्के आसनक्षमता असूनही ‘डार्लिंग’ ला अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा - inside story of Madipa's revenge : '83' विश्वचषकात कपिल देव आणि मदनलालने असा घेतला रिचर्ड्सचा बदला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.