ETV Bharat / sitara

रवी जाधव दिग्दर्शित ‘रंपाट’ १७ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचा आगामी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यातून अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकेल. सिनेमाचे म्यूझिक लॉन्च धुमधडाक्यात पार पडले.

रम्पाट म्यूझिक लॉन्च
author img

By

Published : Apr 25, 2019, 4:20 PM IST

स्वप्न आपण सर्वच पाहतो, या स्वप्नांना मोठं व्हायला वेळ लागत नाही. ही स्वप्नं पूर्ण होण्याची गॅरंटी किंवा संपण्याची एक्सपायरी डेट घेऊन येत नाहीत. असंच हल्लीच्या तरुण पिढीला एक स्वप्नाने झपाटून टाकलयं आणि ते स्वप्न आहे स्टारडमचं! हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशाच्या, महाराष्ट्राच्या गावा-गावातून, कानाकोपऱ्यातून ही तरुण मंडळी एकाच दिशेकडे प्रवास करीत असतात ती दिशा म्हणजे मुंबई.

रंपाटमधील मिथुन आणि मुन्नी सुद्धा याच स्वप्नाचा पाठलाग करतायत, पण हे स्वप्नं सहज पूर्ण होणं शक्य नाही, तर त्याला लागते अथक मेहनतीची व योग्य मार्गदर्शनाची जोड आणि याच प्रवासाची मनोरंजक कथा आहे रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘रंपाट’! येत्या १७ मे'ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊन मनोरंजन करायला सज्ज झालाय. नुकताच याचित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला.

आयुष्यात काही जण संधी मिळण्याची वाट पाहत राहतात, तर काही संधीपर्यंत स्वत:च चालत जातात. रंपाट ही अशाच दोघांची म्हणजेच मिथुन आणि मुन्नीची गोष्ट आहे. सोलापूरचा मिथुन आणि कोल्हापूरची मुन्नी असेच फटाफट यश मिळवून झटपट स्टार बनून रग्गड पैसा कमवून आपापल्या आई-वडिलांच्या इच्छा आकांशा पूर्ण करायचे स्वप्न घेऊन मुंबईला येतात व त्यानंतर सुरु होतो स्वप्नांच्या वाटेवरचा संगीतमय गंमतीदार प्रवास. चंदेरी स्वप्नांच्या मागे पळताना त्यातून त्यांना मिळणारा धडा, येणारं शहाणपण, त्यातून फुलणारे स्व त्व याची ही रवी जाधव दिग्दर्शित कहाणी जी त्यांना आयुष्यात 'वन टाईम हिट होण्यापेक्षा ऑल टाईम हिट' कसे बनायचे याचे हसत खेळत प्रात्यक्षिक घडवते.

झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी आणि अथांश कम्युनिकेशनच्या मेघना जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात मिथुन आणि मुन्नी यांच्या भूमिकेत अभिनेता अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी ही जोडी बघायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात प्रिया बेर्डे, अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रिके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून वैभव मांगले, आनंद इंगळे, चंद्रकांत कुलकर्णी, अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर पाहुणे कलाकार म्हणून लाभले आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित, रवी जाधव यांचे आहेत. चित्रपटाचे संकलन अभिजित देशपांडे यांनी केलं असून वेशभूषा मेघना जाधव यांची आहे. संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून सौरभ भालेराव यांचे पार्श्वसंगीत आहे. वासुदेव राणे यांनी छायाचित्रणातून मिथुन आणि मुन्नीचे भावविश्व रंपाटमध्ये चितारले आहे.

रंपाट चित्रपटामध्ये चिनार महेश या द्वयीच्या संगीताने सजलेली चार गाणी आहेत आणि सध्या सोशल नेटवर्कवर आयच्या आनं रं हे गाणं तुफान लोकप्रिय झालं आहे. काही दिवसांतच लाखाच्यावर हिट्स मिळवलेल्या या गाण्यांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यातही विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘रॅप्’चा. मराठी चित्रपटात पहिल्यांदाच रॅप गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाणी गुरु ठाकूर, मंगेश कांगणे, ए- जीत, जे सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि रवी जाधव यांनी शब्दबद्ध केली आहेत तर बेला शेंडे, रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, ए- जीत, जे सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि किलर रॉक्स (बिटबॉक्सर) यांच्या सोबतीने सौरभ साळुंखे यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. झी म्युझिकच्या द्वारे ही गाणी श्रोत्यांच्या भेटीस आली आहेत.

हा चित्रपट येत्या १७ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. वर्षाच्या सुरुवातीलाच “आनंदी गोपाळ" सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणा-या झी स्टुडिओजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला "रंपाट" प्रेक्षकांची मने जिंकुन घेण्यास सज्ज झाला आहे.

Intro:Body:

Ent News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.