मुंबई - मालिका, नाटक आणि मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची दमदार छाप उमटवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशीसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'बबलू बॅचलर' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टरही तेजश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
तेजश्री आणि शर्मन जोशीसोबत पूजा चोप्रा आणि राजेश शर्मा यांचीदेखील मुख्य भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेजश्रीने शेअर केलेल्या फर्स्ट लुकमध्ये ती नवरीच्या वेशात अतिशय सुंदर दिसत आहे. तर, शर्मन जोशी देखील दोन बायकांच्या मध्ये नवरदेवाच्या वेशात पाहायला मिळतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'बबलू बॅचलर' हा चित्रपट कॉमेडी तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा असेल, असा अंदाज या पोस्टरवरून येतो. या चित्रपटाचा ट्रेलरही आज म्हणजे ८ फेब्रुवारीला रात्री प्रदर्शित केला जाणार असल्याचे तेजश्रीने सांगितले आहे.
अजय राजवानी यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केले आहे. २० मार्च ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता मराठी सिनेसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही तेजश्री काय कमाल दाखवते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.