ETV Bharat / sitara

नवाजुद्दीन - सैफसोबत 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या पर्वात या मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी - ranveer shoryi

सेक्रेड गेम्सचे पहिले पर्व संपल्यानंतर चाहत्यांना या सीरिजच्या दुसऱ्या भागाची आतुरता होती. अनेकदा या सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाले. मात्र, आता १५ ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

नवाजुद्दीन - सैफसोबत 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या पर्वात या मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी
author img

By

Published : Jul 11, 2019, 7:49 PM IST

मुंबई - नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स'चे दुसरे पर्व प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहे. अलिकडेच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे गणेश गायतोंडे म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीची दमदार झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. तर, सैफचीही झलक चाहत्यांना सुखावून गेली. आता त्यांच्यासोबत आणखी एक मराठी अभिनेत्री देखील दिसणार आहे.

सेक्रेड गेम्सचे पहिले पर्व संपल्यानंतर चाहत्यांना या सीरिजच्या दुसऱ्या भागाची आतुरता होती. अनेकदा या सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाले. मात्र, आता १५ ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि सैफसोबत अभिनेत्री स्मिता तांबे हिची वर्णी लागली आहे.

यापूर्वी राजश्री देशपांडे ही मराठी अभिनेत्री या सीरिजमध्ये दिसली होती. तर, राधिका आपटेचीदेखील भूमिका चांगलीच गाजली होती. आता दुसऱ्या पर्वामध्ये अभिनेत्री कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी यांची नव्याने एन्ट्री होणार आहे. तसेच, स्मिता तांबेची देखील महत्वपूर्ण भूमिका असेल.

१५ ऑगस्टला बॉलिवूडचे तीन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 'साहो', 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' या चित्रपटांसोबतच 'सेक्रेड गेम्स २'ची देखील आता भर पडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा कल कोणत्या बाजुला असेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.