ETV Bharat / sitara

मराठी कलाकार म्हणतात #पुन्हानिवडणूक, सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण

author img

By

Published : Nov 15, 2019, 7:55 PM IST

एकीकडे राज्यात सत्तास्थापनेचा तिढा चांगलाच रंगला आहे. अशातच मराठी कलाकारांनी केलेली ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती. मात्र, याबाबत आता खुद्द सिद्धार्थ जाधवनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठी कलाकार म्हणतात #पुन्हानिवडणूक, सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण

मुंबई - मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग सुरू केला होता. यामध्ये सोनाली कुलकर्णी, अंकुष चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर नेटकरी चांगलेच संभ्रमात पडले. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेचा तिढा चांगलाच रंगला आहे. अशातच मराठी कलाकारांनी केलेले हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती. मात्र, याबाबत आता खुद्द सिद्धार्थ जाधवनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

सिद्धार्थने #पुन्हानिवडणूक असे ट्विट केल्यानंतर पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, 'आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही”, असं सिद्धार्थने स्पष्ट केलं आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टवरून मराठी कलाकारांचा हा फंडा आगामी मराठी चित्रपट 'धुरळा' यासाठी असल्याचं बोललं जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार काही ना काही युक्ती वापरत असतात. त्यामुळेच राजकारणावर आधारित असलेल्या 'धुरळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आत्तापासूनच मराठी कलाकार सज्ज झाले आहेत.

हेही वाचा -'तान्हाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ट्रेलरही लवकरच येणार भेटीला

पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.

हेही वाचा -बंदिस्त चौकटीचा पिंजरा तोडून 'गर्ल्स' प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ट्रेलर

Intro:Body:

marathi actor Siddharth jadhav on punha nivadnuk hashtag

key words - #पुन्हानिवडणूक, Siddharth jadhav on punha nivadnuk hashtag, marathi celebs use #पुन्हानिवडणूक, Siddharth jadhav clarify punha nivadnuk hashtag

#पुन्हानिवडणूक बाबत सिद्धार्थ जाधवचे स्पष्टीकरण

मुंबई - मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग सुरू केला होता. यामध्ये सोनाली कुलकर्णी, अंकुष चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर नेटकरी चांगलेच संभ्रमात पडले. एकिकडे राज्यात सत्तास्थापनेचा तिढा चांगलाच रंगला आहे. अशातच मराठी कलाकारांनी केलेले हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती. मात्र, याबाबत आता खुद्द सिद्धार्थ जाधवनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

सिद्धार्थने #पुन्हानिवडणूक असे ट्विट केल्यानंतर पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे, की 'आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही”, असं सिद्धार्थने स्पष्ट केलं आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टवरुन मराठी कलाकारांचा हा फंडा आगामी मराठी चित्रपट 'धुरळा' यासाठी असल्याचं बोललं जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार काही ना काही युक्ती वापरत असतात. त्यामुळेच राजकारणावर आधारित असलेल्या  'धुरळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आत्तापासूनच मराठी कलाकार सज्ज झाले आहेत.

पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.