मुंबई - अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचे दिग्दर्शन असलेला 'मन फकीरा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची दोन पोस्टर्स प्रसिध्द करण्यात आली आहेत.
'मन फकीरा' चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मृण्मयीने केले आहे. स्मिता फिल्म्स प्रॉडक्शनच्या पर्पल बुलेटच्या वतीने हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'मन फकीरा' या चित्रपटात अंकित मोहन आणि अंजली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अंकित मोहन यात नचिकेत ही व्यक्तीरेखा साकारतोय, तर अंजली पाटील माहीच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची दोन पोस्टर्स रिलीज करण्यात आली आहेत.१४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.