ETV Bharat / sitara

“स्वातंत्र्यवीर सावरकर” यांचा जीवनपट दिग्दर्शित करतोय महेश मांजरेकर!

निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी “स्वातंत्र्यवीर सावरकर” या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमाचे संगीत हितेश मोदक आणि श्रेयस पुराणिक करतील. महत्त्वाचे म्हणजे सिनेमाचे चित्रीकरण लंडन, अंदमान, आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी समुद्रात मारलेला सूर आणि सेंट्रल जेलमधील प्रसंग अंदमान येथे चित्रित होतील.

author img

By

Published : May 28, 2021, 10:34 PM IST

swatantryaveer-savarkar
“स्वातंत्र्यवीर सावरकर”

सध्याच्या बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपटांच्या काळात एक बायोपिक लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील येऊ घातलेला सिनेमा. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे नाव असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय हिंदी-मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीला याची घोषणा झाली असून चित्रपटात अंगावर काटा उभे करणारे प्रसंग असतील. दिग्दर्शनाबरोबरच महेश मांजरेकर, ऋषि विरमणी यांच्यासह सिनेमाच्या कथेचे लेखन देखील करणार आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर सावरकर प्रेमी बरेच उत्सुक झाले असून सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

swatantryaveer-savarkar
“स्वातंत्र्यवीर सावरकर” पोस्टर

"स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवन संघर्ष नेहमीच मला प्रभावित करत आला आहे. माझे असे स्पष्ट मत आहे की. सावरकरांना देशाच्या इतिहासात जे स्थान मिळायला हवे होत ते मिळाले नाही. या सिनेमाच्या माध्यमातून सावरकरांनी या देशासाठी दिलेले योगदान मांडण्याचा हा माझा छोटा प्रयत्न आहे", अशी प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी दिली.

निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमाचे संगीत हितेश मोदक आणि श्रेयस पुराणिक करतील. महत्त्वाचे म्हणजे सिनेमाचे चित्रीकरण लंडन, अंदमान, आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी समुद्रात मारलेला सूर आणि सेंट्रल जेलमधील प्रसंग अंदमान येथे चित्रित होतील.

"सावरकरांचे जीवन हे खूप संघर्षमय आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच मला प्रोत्साहित करते. या देशाच्या तरुणांना सावरकरांचे विचार प्रेरणा देणारे आहेत. या सिनेमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो" अशी प्रतिक्रिया सिनेमाचे निर्माते अमित वाधवानी यांनी दिली. सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त या सिनेमाची घोषणा करण्यात आली.

थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन संघर्षावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.