मुंबई - मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा बनवण्याचे भाग्य काही मोजक्या कलाकारांच्या वाट्याला येते. दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू असाच एक भाग्यवान आहे. हा पुतळा सिंगापूरच्या संग्रहालयात बसवण्यात आला असला तरी त्याचे अनावरण हैदराबादमध्ये सुपरप्लेक्स एएमबी सिनेमा हॉलमध्ये पार पडले होते.
हा मेणाचा पुतळा महेश बाबूसाठी नाही तर मादाम तुसाग संग्रहालयासाठी खास आहे. कारण पहिल्यांदाच या संग्रहालयाचील पुतळ्याचे अनावरण सिंगापूरच्या बाहेर करण्यात आले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिंगापूरच्या या संग्रहालयात अनेक सेलेब्रिटींचे पुतळे आहेत. जगभरातील पर्यटक या संग्रहालयाला भेट देऊन आपल्या आवडत्या कलाकारासोबत सेल्फी घेतात. महेश बाबूची लोकप्रियतादेखील अफाट आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
महेश बाबूचा आगामी महर्षी हा चित्रपट त्याच्य़ा करियरचा २५ वा चित्रपट असेल. यातील त्याचा लूक आणि टीझर त्याच्या वाढदिवशी लॉन्च करण्यात आला होता. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे.