हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि दक्षिण सुपरस्टार विजय सेतूपती ही जोडी दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपटामध्ये स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. शूटिंग सुरू होण्यापूर्वीच या चित्रपटाला अनिश्चित काळासाठी धक्का बसला आहे.
अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विजय सेतूपती यांचा हा चित्रपट विना इंटरव्हलचा ९० मिनीटांचा चित्रपट असणार आहे. दरम्यान दिग्दर्शक राघवनचा इक्कीस हा बिग बजेट चित्रपट वरुण धवनसोबत फास्ट ट्रॅकवर होणार आहे. त्यामुळे कॅटरिनासोबतचा चित्रपट लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - कंडोम परिक्षकाची भूमिका साकारणार रकुल प्रीत सिंह