ETV Bharat / sitara

‘बिग बॉस ओटीटी’ मधील ‘हा’ स्पर्धक आहे माधुरी दीक्षितचा फेव्हरेट! - karan nath

करण नाथ हा राकेश नाथ यांचा मुलगा. त्याचे वडिल राकेश नाथ यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे सेक्रेटरीपद भूषविले होते. माधुरीचे त्यांच्या सल्ल्याशिवाय पानही हलत नसे त्यामुळे राकेश नाथ या नावालाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये वलय प्राप्त झालं होतं.

big boss ott
माधुरी दीक्षितचा फेव्हरेट
author img

By

Published : Aug 22, 2021, 10:07 PM IST

मुंबई - ‘बिग बॉस’ चे नवे व्हर्जन ‘बिग बॉस ओटीटी’ सुरु झाल्यापासून नेहमीप्रमाणे चर्चेत आहे. सामान्य प्रेक्षकांप्रमाणेच अनेक फिल्मी कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय या शोचे पाठीराखे आहेत. नुकताच प्रदर्शित होऊन गेलेल्या ‘गन्स ऑफ बनारस’ मधील प्रमुख कलाकार करण नाथ यावर्षी ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये दाखल झाला आहे. करण नाथ हा राकेश नाथ यांचा मुलगा. त्याचे वडिल राकेश नाथ यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे सेक्रेटरीपद भूषविले होते. माधुरीचे त्यांच्या सल्ल्याशिवाय पानही हलत नसे त्यामुळे राकेश नाथ या नावालाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये वलय प्राप्त झालं होतं. त्यांचा मुलगा ‘बॉग बॉस’ च्या शोचा भाग झाल्यावर माधुरीला आनंदच झाला होता आणि तिचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे तसेच तोच तिचा आवडता स्पर्धक आहे.

big boss ott
माधुरी दीक्षितचा फेव्हरेट
असं म्‍हणतात की, भाग्‍य नेहमीच शूरवीरांना साथ देते आणि सद्यस्थितीमध्‍ये करण नाथसाठी फक्‍त भाग्‍यच नाही तर बॉलिवुडमधील काही सर्वोत्तम कलाकारांकडून देखील पाठिंबा मिळाला आहे. बिग बॉस ओटीटीमधील स्‍पर्धकांपैकी एक असलेल्‍या करणचे नुकतेच बरेच कौतुक करण्‍यात आले आहे. बॉलिवुडच्या काही प्रभावी चित्रपटांमध्‍ये काम केलेला हा प्रतिभावान अभिनेता शोच्‍या प्रमुख सीझनमधील एक स्‍पर्धक आहे. बिग बॉसमधील करण नाथचा गेम सर्वांना आवडला आहे. त्‍यांनी अनेक प्रसंगांमध्‍ये आवश्‍यक त्‍यावेळी आवाज उठवला आहे. नुकतेच बिग बॉस हाऊसमध्‍ये प्रवेश केलेल्‍या मॅचमेकर सिमा तपारिया यांनी देखील त्‍याचे कौतुक केले.

करण नाथला पाठिंबा
नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्‍यात आलेल्‍या एका व्हिडिओमध्‍ये दिग्‍गज कलाकार शक्‍ती कपूर व माधुरी दिक्षित करणचे कौतुक करताना दिसण्‍यात आले. शक्‍ती कपूर यांनी त्‍यांच्‍या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि माधुरी दिक्षित यांनी व्हिडिओमध्‍ये एक कथा शेअर केली. त्‍यांनी या कथेमध्‍ये लोकांना बिग बॉस पाहण्‍याचे आणि करण नाथला पाठिंबा देत त्‍याच्‍यासाठी वोट देण्‍याचे आवाहन केले.

big boss ott
माधुरी दीक्षित
चित्रपटसृष्‍टीमधील हे दिग्‍गज कलाकार पुढाकार घेत त्‍यांच्‍या आवडत्‍या स्‍पर्धकांना नॉमिनेशन्‍सपासून वाचविण्यासाठी पाठिंबा देताना दिसत आहेत. अभिनेता शक्‍ती कपूर व माधुरी दिक्षित यांचे अनेक चाहते आहेत आणि करण नाथ प्रती त्‍यांचा पाठिंबा त्‍याच्‍या समर्थकांमध्‍ये अधिक वाढ करेल.

हेही वाचा - सलमान खान 'टायगर 3' मधील फर्स्ट लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.