मुंबई - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका कंगना राणावत साकारणार आहे. जया असे शीर्षक असलेल्या या बायोपिकसाठी कंगना खूप तयारी करीत आहे.
कंगनाला जयललिता यांच्यासारखे दिसायचे आहे. यासाठी ती स्वतःत जो बदल करणार आहे त्यामुळे तिचा चेहराही ओळखून येणार नाही. मंगळवारी तिने याचा खुलासा एक मुलाखतीत केला.
कंगना म्हणाली, "जयललिता यांची व्यक्तीरेखा साकारणे उत्तम अनुभव असेल. पहिल्यांदाच मी माझे रुप बदलायला निघाली आहे. पहिल्यांदाच असे घडेल की माझा चेहरा पडद्यावर दिसणार नाही. या शिवाय जे लोक मला चेहऱ्यानिशी ओळखतात ते ओळखू शकणार नाहीत. माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मला वाटते की एक कलाकार म्हणून मला निःस्वार्थी व्हायला हवे."
तामिळ भाषेत 'थलाइवा' आणि हिंदीमध्ये 'जया' या नावाने चित्रपट रिलीज होईल. याचे दिग्दर्शन एएल विजय करीत आहेत.