ETV Bharat / sitara

खऱ्या अर्थाने आज आपण स्वतंत्र आहोत, यापूर्वी सर्व 'इटालियन सरकार'चे गुलाम होते, कंगनाचा काँग्रेसवर निशाणा?

२९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. कंगनानेही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तिने आपले मत व्यक्त केले.

कंगना रनौत
author img

By

Published : Apr 30, 2019, 12:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या परखत आणि स्पष्ट मतांसाठी ओळखली जाते. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांवर ती आपल्या शब्दांचे बाण सोडत असते. मात्र, आता तिने एक पाऊल पुढे टाकत काँग्रेसवरच निशाणा साधला आहे. २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. कंगनानेही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तिने आपले मत व्यक्त केले.

Kangana  Ranaut
कंगना रनौत

महाराष्ट्रात काल (२९ एप्रिल) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. मुंबईतील बांद्रा, जुहूसह अनेक मतदान केंद्रावर कलाविश्वातील अनेक कलकारांनी मतदान केले. कंगनाने मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, की 'खऱ्या अर्थाने आज आपण स्वतंत्र झालो आहोत. यापूर्वी आपण इटालियन सरकारचे गुलाम होतो'. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियामध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कंगनाने सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत हे मत मांडले, अशा प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात उमटत आहेत. ती 'भाजप'ची समर्थक असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी तिने अनेक मुलाखतींमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रशंसा केली आहे.

खऱ्या अर्थाने आज आपण स्वतंत्र आहोत, यापूर्वी सर्व 'इटालियन सरकार'चे गुलाम होते, कंगनाचा काँग्रेसवर निशाणा?

पुढे बोलताना ती म्हणाली, की 'मतदानाचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याचा फायदा घ्या. आपल्या मताचा परिपूर्ण वापर करा आणि मतदान करा'.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.