मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनच्या घरी एका नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच कल्कीने आई बनणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. कल्कीचा गरोदरपणा हा बराच चर्चेचा विषय बनला होता. कारण, कल्कीने अद्याप तिच्या प्रियकराशी लग्न केले नाही. त्यामुळे लग्नापूर्वीच कल्की आई बनली आहे.
कल्की आणि तिचा प्रियकर गाय हर्शबर्ग हे गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्कीने हर्शबर्गसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गाय हर्शबर्ग हा इस्रायलचा क्लासिकल पियॉनो वादक आहे. त्यानंतर तिने गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र, तिला या कारणामुळे काहींनी ट्रोलही केले होते. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून कल्की तिच्या निर्णयावर ठाम राहिली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कल्कीने गरोदरपणातील आपल्या बेबी बंपसोबत बरेच फोटो शेअर केले. हा काळ तिने भरपूर एन्जॉय केला, असे तिच्या या फोटोवरून पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कल्कीने आत्तापर्यंत बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये 'ऐ जवानी है दिवानी', 'देव डी', 'गली बॉय', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'शांघाय' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मागच्या वर्षी कल्कीने तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केले. 'नेरकोंडा पारवाई' या चित्रपटात ती एका गाण्यात झळकली होती.
- View this post on Instagram
He still let's me sit on his lap😍 #8monthspregnant #11kgsup #love Photo by @gangulytikka
">