ETV Bharat / sitara

जॉनसोबत मृणाल ठाकुरची भावनिक केमेस्ट्री, 'बाटला हाऊस'चं नवं गाणं प्रदर्शित - 15 august

'बाटला हाऊस एनकाउंटर'वर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यात जॉन आणि मृणाल यांच्यातील नातेसंबध उलगडण्यात आले आहेत. या चित्रपटात दोघेही पती- पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

जॉनसोबत मृणाल ठाकुरची भावनिक केमेस्ट्री, 'बाटला हाऊस'चं नवं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:57 PM IST

मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'बाटला हाऊस' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर हीदेखील भूमिका साकारत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देखील दिल्या. आता या चित्रपटात जॉन आणि मृणालवर चित्रीत असलेले नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

'बाटला हाऊस एनकाउंटर'वर आधारित हा चित्रपट आहे. नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेल्या गाण्यात जॉन आणि मृणाल यांच्यातील नातेसंबध उलगडण्यात आले आहेत. या चित्रपटात दोघेही पती- पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. जॉन पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याच्या नोकरीमुळे त्यांच्या नात्यात कशाप्रकारे दुरावा निर्माण होतो, हे गाण्यात पाहायला मिळते. अंकित तिवारी आणि ध्वनी भानुशाली यांनी हे गाणे गायले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जॉनने या गाण्याचे एक पोस्टर शेअर करुन 'प्यार के रास्तो पर फर्ज निभाना आसान नही', असे कॅप्शन दिले आहे.

काय आहे चित्रपटाची कथा -
२००८ साली दिल्लीच्या जामिया नगर येथील एल-१८ बाटला हाऊसमध्ये एक एनकाउंटर झाले होते. यामध्ये भारतीय मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार करण्यात आले होते. पुढे हे एनकाउंटर खोटे असल्याचे सांगत याबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. या चित्रपटात जॉन हा पोलीस अधिकारी संजीव कुमार यांची भूमिका साकारत आहे.
दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.