ETV Bharat / sitara

Jhimma Movie : ‘झिम्मा’ने सेलिब्रेट केला ‘गोल्डन ज्युबिली डे’! - झिम्मा चित्रपट 50 दिवस साजरा

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. १९ नोव्हेंबरला २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही पसंती दर्शवली असून सिनेसृष्टीतूनही ‘झिम्मा' ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा अद्यापही सुरुच आहे. 'झिम्मा'चे नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले असूनही या चित्रपटाने हाऊसफुल्लचा बोर्ड कायम ठेवला आहे. ( 'Jhimma' movie team Celebrates Golden Jubilee Day )

Jhimma Movie
झिम्मा
author img

By

Published : Jan 8, 2022, 10:13 AM IST

मुंबई - पूर्वी एखाद्या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात २५ आठवडे पूर्ण केले की ‘सिल्व्हर ज्युबिली’ म्हणत आणि ५० आठवडे पूर्ण केले की ‘गोल्डन ज्युबिली’ म्हणत. हल्लीच्या काळात चित्रपटाच्या यशापयशाची गणितं पहिल्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत मंडळी जातात. हल्ली चित्रपट एकाच थिएटरमध्ये फार आठवडे न चालणाऱ्या काळात, एका मराठी चित्रपटाने इतिहास राचलाय. ‘झिम्मा’ ने सलग ५० दिवस चालण्याचा छोटासा विक्रमच केलाय.

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. १९ नोव्हेंबरला २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही पसंती दर्शवली असून सिनेसृष्टीतूनही ‘झिम्मा' ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा अद्यापही सुरुच आहे. 'झिम्मा'चे नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले असूनही या चित्रपटाने हाऊसफुल्लचा बोर्ड कायम ठेवला आहे. खरंतर कोरोना निर्बंधांमुळे सर्व थिएटर पन्नास टक्के क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. त्यातही बॅालिवूडचे अनेक चित्रपट शर्यतीत असतानाही उत्तम कथालेखन, दिग्दर्शन आणि तगड्या स्टारकास्टच्या बळावर 'झिम्मा'ने अर्धशतकाचा टप्पा गाठला आहे . इतकेच नाही तर बॅाक्स ॲाफिसवरही ५० दिवसात तब्बल १४ करोडची कमाई केली आहे. ५० व्या दिवशी झिम्मा ८० हुन अधिक सिनेमागृहांमधे आहे हा एक रेकॅार्ड आहे. ( 'Jhimma' movie team Celebrates Golden Jubilee Day )

'झिम्मा' हा चित्रपट फक्त मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात नाही तर हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी पोहोचला जेथे ग्रामीण स्त्रियांनी मागण्या करून या चित्रपटाला त्यांच्या गावातील थिएटरमध्ये आणायला भाग पाडले. तसेच यावेळी असा काही ग्रामीण महिला वर्गसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला ज्यांनी 'झिम्मा'च्या निमित्ताने पहिल्यांदा थिएटरमध्ये जाउन त्यांचा पहिला सिनेमा पाहिला. हे सर्व पाहून अतिशय आनंद होतो की ग्रामीण लोक आणि विशेषतः महिला वर्गसुद्धा आज मराठी चित्रपटाला इतका भरभरून पाठींबा देत आहेत.

‘झिम्मा'ला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियेबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. तसेच बर्‍याच वर्षांनी एखादा मराठी चित्रपट इतके दिवस थिएटरमध्ये टिकून राहिला असून लॉकडाऊननंतर सलग पन्नास दिवस महाराष्ट्रभर थिएटरमध्ये चालणारा 'झिम्मा' पहिला चित्रपट ठरला आहे. याचा निश्चितच खूप आनंद व अभिमान वाटत आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि चांगल्या विषयांवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तसेच प्रेक्षकांकडून अनेक भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या कलाकृतीला मिळणाऱ्या या सकारात्मक प्रतिक्रयेमुळे एक समाधान आहे आणि या सगळ्याचे श्रेय ‘झिम्मा’च्या टीमला आणि साहजिकच प्रेक्षकांना जाते.’’

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘गोल्डन ज्युबिली डे’ साजरा करणाऱ्या ‘झिम्मा’ च्या टीम ला त्यांचा चित्रपट १०० दिवस चालावा, असे मनापासून वाटते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.