लॉस एंजेलिस - हॉलिवूड स्टार डॅनियल क्रेग याला संपूर्ण जग जेम्स बाँडच्या भूमिकेमुळे ओळखते. आता तो शेवटची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालाय. एका मुलाखतीच्यावेळी त्याने नवीन जेम्स बाँडला सल्ला दिला आणि सांगितले की, ही भूमिका चांगली आहे. डॅनियल क्रेग याला, जेम्स बाँडच्या भूमिकेत 2006मध्ये आलेल्या ‘कासिनो रॉयल’ या चित्रपटापासून ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल.
एका नामवंत वृत्त संस्थेच्या बातमीनुसार, "द टुनाइट शो विथ जिम्मी फालन' या मुलाखतीदरम्यान डॅनियल क्रेगला पुढील बाँडला कोणता सल्ला देणार, असे विचारण्यात आले."
त्यावर क्रेगने उत्तर दिले, "ही एक चांगली आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे. येथे आणखी काय सांगावे, याची मला काही कल्पना नाही. जेव्हा तुम्हाला ते मिळेल, तेव्हा ते चांगले होईल."
'नो टाइम टू डाय' हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे त्याच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.