मुंबई - सध्या प्रभासच्या 'साहो' चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. या चित्रपटात त्याची श्रध्दा कपूरसोबत जोडी आहे याची कल्पना चाहत्यांना आहे. मात्र प्रभासचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतही हॉट डान्स आहे याची कल्पना कुणीच केली नव्हती.
रामोजी फिल्म सिटीमध्ये पार पडलेल्या साहो प्री लॉन्च इव्हेन्टमध्ये प्रभास आणि जॅकलिनचा हा हॉट डान्स परफॉर्मन्स दाखवण्यात आला आणि चाहते दंग झाले. 'साहो' चित्रपटात 'बॅड बॉय' या गाण्यावर जॅकलिनने सिझलिंग परफॉर्मन्स केला आहे. पाश्चिमात्य नृत्यांमध्ये ती तरबेज आहे. याचा पुरेपुर फायदा तिने या गाण्यात उठवला आहे.
'बॅड बॉय' हे गाणे ऑस्ट्रेलियात शूट झाले आहे. प्रभास आणि जॅकलिन यांचा पडद्यावरील वावर चकित करणारा आहे. दोघांच्याही फॅन्ससाठी त्यांना एकत्रीत पाहणे पर्वणी ठरले आहे.
'साहो' चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता वाढत चालली आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर चाहते प्रेमात पडले. गेली तीन वर्षे प्रभास या चित्रपटासाठी अहोरात्र मेहनत करतोय हा चित्रपट तेलुगु, तामिळ आणि हिंदी या तिन्ही भाषेत रिलीज होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी 'साहो' प्रदर्शित होणार आहे.