ETV Bharat / sitara

Money laundering case : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'ईडी' कार्यालयात दाखल; नेमकं प्रकरण काय आहे? - अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस

दोनशे कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) संबंधित प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची आज चौकशी केली. ईडीने नुकतेच जॅकलीनला मुंबईहून यूएईला जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले होते.

Jacqueline Fernandez
जॅकलीन फर्नांडिस
author img

By

Published : Dec 8, 2021, 1:01 PM IST

नवी दिल्ली - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आहे. दोनशे कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) संबंधित प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने तीची बुधवारी चौकशी केली आहे.

ईडीने नुकतेच जॅकलीनला मुंबईहून यूएईला जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले होते. यानंतर, ईडीने सोमवारी अभिनेत्रीला समन्स बजावले होते आणि तिला 8 डिसेंबर रोजी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. गेल्या शनिवारी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनसह इतर अनेक नावांचा समावेश आहे.

तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो या वर्षीच्या एप्रिल-जून महिन्यातील असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता. जॅकलिनला तो चेन्नईमध्ये चार वेळा (Jacqueline Meets Sukesh) भेटला होता, या भेटीसाठी त्याने प्रायव्हेट जेटची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते.

9 लाखाची पार्शियन कॅट दिली भेट

जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर यांनी भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर भेट दिल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याने जॅकलिन अनेकवेळा महागडे दागिनेही भेट दिले होते. सुकेश याच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ही माहिती उघड झाली आहे. या आरोपपत्रात जॅकलिनसोबत आणखी एक अभिनेत्री नोरा फतेही हिचेही नाव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.