ETV Bharat / sitara

अभिषेक बनर्जीने आसिफ बसरा यांच्या आठवणी केल्या शेअर - आसिफ बसरा मृत्यू

अभिनेता अभिषेक बॅनर्जी बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम करतो. त्याने ‘पाताल लोक’ या वेब सीरिजमध्ये दिवंगत अभिनेता आसिफ बसराबरोबर काम केले होते. आसिफ बसराच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना अभिषेकने काही आठवणी शेअर केल्या आहेत.

Abhishek Banerjee
अभिषेक बनर्जी
author img

By

Published : Nov 13, 2020, 1:24 PM IST

मुंबई - अभिनेता अभिषेक बॅनर्जी याने आसिफ बसराच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. अभिषेकने ‘पाताल लोक’ या वेब सीरिजमध्ये दिवंगत अभिनेता आसिफबरोबर काम केले होते. अभिषेकने काही दिवस कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले होते. त्याने 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई' आणि 'नॉक आऊट' या चित्रपटात आसिफ बसरा यांना काम करण्याची संधी दिली होती.

हेही वाचा -कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिचा ट्रान्सपरंट उपाय

अभिषेकने सांगितले की, "इंडस्ट्रीतील हे माझे सुरुवातीचे दिवस होते. मी माझे ज्येष्ठ सहकारी गौतम यांच्या माध्यमातून आसिफजींना भेटलो. त्यांनी आसिफजींना ब्लॅक फ्रायडेसाठी कास्ट केले होते. त्यानंतर आम्ही त्यांना बर्‍याच जाहिराती, टीव्ही शो आणि अलिकडेच पाताल लोकमध्ये कास्ट केले होते.''

अभिषेक म्हणाला, "हे फारच दुःखद आहे. मी अनेक वर्षांपासून आसिफजींना ओळखतो आणि अनेक प्रोजेक्टमध्ये कास्ट केल्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत. ते एक महान अभिनेता आणि दयाळू व्यक्ती होते.''

हेही वाचा -मल्टिप्लेक्स, नाट्यगृहाच्या करमणूक शुल्क वाढीला स्थायी समितीचा विरोध, करवाढ तूर्तास टळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.