मुंबई - चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांचे आज कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभर चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत आणि सचिन तेंडूलकरपासून ते सामान्य प्रेक्षकांसाठी हा धक्का होता. इरफान यांच्या आठवणीत संपूर्ण सिनेजगत रमले आहे. इरफान यांचा वर्सोवा येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे इरफान खान यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अधिकवेळा ठेवण्यात आलेले नाही. त्यांचे कुटुंबिय आणि मोजक्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वर्सोवा येथे दफनविधी पार पडला.
इरफान यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक आणि प्रेक्षक इरफान यांच्या आठवणी जागवत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रध्दांजली वाहिली जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इरफान खानच्या अंत्यदर्शनाचे काही फोटो प्रसिध्द झाले आहेत. त्यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी अनेकजण जमले होते. मात्र लॉकडाऊन सुरू असल्यामुळे पोलिसांनी काही मयार्दा घालून दिल्या होत्या. अखेर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचे पार्थिव व्हर्सोवा कब्रस्तानाकडे नेण्यात आले. सुमारे तीन वाजता त्यांच्यावर दफनविधी पार पडला.