प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चोरीचा मामला हा सिनेमा आता लवकरच आपल्या भेटीला येतोय. बऱ्याच दिवसांनी आशयघन किंवा ऐतिहासिक सिनेमा वगळता विनोदी सिनेमा मराठीत येऊ घातला आहे.. सलग 33 रात्री शूट झालेल्या या सिनेमाच्या शुटींगदरम्यान अनेक धमाल प्रसंग घडले आहेत.
प्रसंगी कलाकारांना फक्त घाम नाही तर रक्तही सांडून आपली भूमिका चोख करावी लागली आहे. जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अमृता खानविलकर यांच्याशिवाय क्षिती जोग आणि अनिकेत विश्वासराव यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात काम करण्याचा अनुभव आणि प्रियदर्शन जाधवच्या दिग्दर्शनाच वैशिष्ट्य याबाबत या टीमने ई टीव्ही भारतशी खास गप्पा मारल्या आहेत पाहूया हा 'चोरीचा मामला' नक्की आहे तरी काय ते..