मुंबई - बॉलिवूडचे दोन हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट २ ऑक्टोंबरला सिनेमागृहात दाखल झाला. दोन अॅक्शन हिरो एकत्र पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षकांचा या चित्रपटाला दमदार प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.
चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट हृतिक आणि टायगर दोघांच्याही करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच यावर्षीचाही हा बिगेस्ट ओपनर ठरला आहे.
-
‘War’ 1st day net all-India total collection could be Rs. 48-49 crore. Although released on about 1,000 screens less than ‘Thugs Of Hindostan’, and despite opposition of ‘Syeraa’ and ‘Joker’, it has opened phenomenally well. It just... just could be the biggest Hindi film opening
— Komal Nahta (@KomalNahta) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">‘War’ 1st day net all-India total collection could be Rs. 48-49 crore. Although released on about 1,000 screens less than ‘Thugs Of Hindostan’, and despite opposition of ‘Syeraa’ and ‘Joker’, it has opened phenomenally well. It just... just could be the biggest Hindi film opening
— Komal Nahta (@KomalNahta) October 2, 2019‘War’ 1st day net all-India total collection could be Rs. 48-49 crore. Although released on about 1,000 screens less than ‘Thugs Of Hindostan’, and despite opposition of ‘Syeraa’ and ‘Joker’, it has opened phenomenally well. It just... just could be the biggest Hindi film opening
— Komal Nahta (@KomalNahta) October 2, 2019
'वॉर'च्या पूर्वी सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई सर्वाधिक होती. मात्र, या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत 'वॉर'ने पहिल्याच दिवशी अर्धशतकापेक्षा जास्त कमाई केली आहे.
हेही वाचा -कवयित्री अश्विनी शेंडेंनी 'शब्दांच्या कॅफे'तून उलगडला प्रवास
हृतिक आणि टायगरच्या 'वॉर'ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यावर प्री - बुकिंगमध्येच या चित्रपटाने ३१ ते ३२ कोटींची कमाई केली होती.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'वॉर' चित्रपट तब्बल ३८०० स्क्रिन्सवर झळकला आहे. थरारक अॅक्शन्स आणि हृतिक - टायगरची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट आणखी कोणते विक्रम रचतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ