विक्रम वेधा हा दक्षिण भारतीय हिट तमिळ चित्रपट आहे. यात विजय सेतुपती याने 'वेधा' ही व्यक्तीरेखा साकारली असून आर माधवन याने प्रामाणिक पोलीस अधिकारी 'विक्रम' ही भूमिका केली आहे.
'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा सर्वात पहिल्यांदा वेधाच्या भूमिकेसाठी आमिर खानचा विचार झाला होता. आता ही भूमिका ह्रतिक रोशन साकारणार आहे. सैफ अली खान याला विक्रमची भूमिका मिळाली आहे. इतर कलाकारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.
आर. माधवन आणि विजय सेतुपती याची मूळ भूमिका असलेल्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकमधील नायकांची नावे आता स्पष्ट झाली आहेत. बॉलिवूड चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे.
-
#Hrithik @iHrithik and #SaifAliKhan to act in the Hindi remake of #VikramVedha. To be directed by @PushkarGayatri. September 30, 2022 release. pic.twitter.com/03ptb4XExv
— Rajasekar (@sekartweets) July 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Hrithik @iHrithik and #SaifAliKhan to act in the Hindi remake of #VikramVedha. To be directed by @PushkarGayatri. September 30, 2022 release. pic.twitter.com/03ptb4XExv
— Rajasekar (@sekartweets) July 10, 2021#Hrithik @iHrithik and #SaifAliKhan to act in the Hindi remake of #VikramVedha. To be directed by @PushkarGayatri. September 30, 2022 release. pic.twitter.com/03ptb4XExv
— Rajasekar (@sekartweets) July 10, 2021
हिंदी रिमेकचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री हे तमिळ चित्रपट दिग्दर्शक करणार आहेत. कोविडमुळे उशीर झालेला चित्रपटाचे शूटिंग पुढील काही आठवड्यात सुरू होणार असून 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित करण्याचे निर्मात्यांनी ठरविले आहे.
दरम्यान, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची भूमिका असेल्या फाइटर चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन फ्रेंचायझी चित्रपट आहे.
सैफ अली खानचा नवा चित्रपट 'भूत पोलीस' आहे. याचे पवन कृपालिनी दिग्दर्शक असून यात अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम या कलाकारांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा -नितीन गडकरी यांच्या खासदारकीला नाना पटोलेंचे न्यायालयात आव्हान; सुनावणी ६ ऑगस्टला