ETV Bharat / sitara

'तेरी मेरी कहानी' नंतर हिमेश रेशमियाचं नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल, नेहा कक्करनेही शेअर केला व्हिडिओ - happy hardy and heer trailer

हिमेशने या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सर्व कलाकारांच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळते.

'तेरी मेरी कहानी' नंतर हिमेश रेशमियाचं नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल, नेहा कक्करनेही शेअर केला व्हिडिओ
author img

By

Published : Oct 3, 2019, 3:12 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता असलेल्या हिमेश रेशमिया सध्या त्याच्या 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचं राणू मंडल यांच्यासोबतचं 'तेरी मेरी कहाणी' हे गाणं सुपरहिट झालं. आता पुन्हा एकदा त्याने या चित्रपटातील एका नव्या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यातही राणू मंडलसोबत उदित नारायण, हिमेश रेशमिया आणि पायल देव यांच्या आवाजाची झलक ऐकायला मिळणार आहे.

हिमेशने या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सर्व कलाकारांच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळते. हिमेशचा हा व्हिडिओ गायिका नेहा कक्करनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या गाण्याची प्रशंसा करून तिने हिमेशच्या 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -शूटर दादींच्या रुपात तापसी - भूमीचा अनोखा अंदाज, 'सांड की आँख'चं गाणं प्रदर्शित

आत्तापर्यंत हा व्हिडिओ १५ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लवकरच हे गाणं प्रदर्शित करण्यात येईल. 'केह रही है नजदीकियां' असे या गाण्याचे बोल आहेत. हिमेशचा 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -पाहा तारा सुतारिया; सिद्धार्थ मल्होत्राची रोमॅन्टिक केमेस्ट्री, 'मरजावां'चं गाणं प्रदर्शित

Intro:Body:

अखेर नितेश राणेंच्या हाती 'कमळ', जिल्हाध्यक्षांच्या हस्ते पक्षप्रवेश

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.