ETV Bharat / sitara

आपल्या जुन्या अंदाजात हिमेश रेशमियाचा हटके लूक, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज - happy hardy and heer trailer

त्याने गायलेलं सुपरहिट गाणं 'आशिकी मे तेरी' या गाण्याचं रिक्रेयेटेड व्हर्जन आणि 'तेरी मेरी कहानी'चं रिमिक्स व्हर्जन गाण्यात त्याचा हा लूक पाहायला मिळणार आहे.

आपल्या जुन्या अंदाजात हिमेश रेशमियाचा हटके लूक, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज
author img

By

Published : Oct 10, 2019, 3:04 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने काही वर्षांपूर्वीच अभिनयातही पदार्पण केलं आहे. त्याचा आगामी 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. तसंच या चित्रपटातील गाणीही सोशल मीडियावर हिट ठरली आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हिमेश त्याच्या जुन्याच स्टाईलमध्ये दिसणार आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांसोबतच त्याच्या स्टाईलसाठीही ओळखला जातो. डोक्यात टोपी घातलेला त्याचा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. त्याने सुरुवातीच्या काळात त्याची हिच स्टाईल जपली होती. आता पुन्हा एकदा तो त्याच स्टाईलमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे.

त्याने गायलेलं सुपरहिट गाणं 'आशिकी मे तेरी' या गाण्याचं रिक्रेयेटेड व्हर्जन आणि 'तेरी मेरी कहानी'चं रिमिक्स व्हर्जन गाण्यात त्याचा हा लूक पाहायला मिळणार आहे.

'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो १२ शहरांचा दौरा करणार आहे. तसंच म्यूझिक कॉन्सर्टचंही आयोजन तो करणार आहे.

हेही वाचा -'धक धक गर्ल'ची निर्मितीक्षेत्रात एन्ट्री, पतीसोबत करणार 'या' चित्रपटाची निर्मिती

अलिकडेच त्याने 'सुपरस्टार सिंगर' या रिअ‌ॅलिटी शोच्या परिक्षकाची जबाबदारी पार पाडली. काही दिवसांपूर्वीच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. आता तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज झाला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'बाला' अन् 'उजडा चमन' मध्ये कोण मारणार बाजी, एकापाठोपाठ होणार प्रदर्शित

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.