ETV Bharat / sitara

गोविंदा म्हणतो 'अवतार'ची भूमिका नाकारली, सोशल मीडियावर 'मीम्स'चा कहर

बॉलिवूडमध्ये स्वतःच्या स्टाईलने चित्रपट करणारा अभिनेता अशी गोविंदाची ओळख आहे. सध्या सोशल मीडियावर तो ट्रेडिंगमध्ये आहे. त्याने रिजेक्ट केलेल्या चित्रपटावरुन त्याचे अनेक मीम्स बनवले जात आहेत.

author img

By

Published : Jul 31, 2019, 8:56 PM IST

गोविंदा म्हणतो 'अवतार'ची भूमिका नाकारली

मुंबई - काही वर्षापूर्वी 'अवतार' हा हॉलिवूड चित्रपट जगभर गाजला होता. या चित्रपटासाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन याने गोविंदाला ऑफर दिल्याचे त्याने एक मुलाखतीत सांगितले होते. तारखा नसल्यामुळे हा रोल त्याने नाकारला, परंतु या चित्रपटाचे शीर्षक त्याने सूचवल्याचे म्हटले आहे.

गोविंदा म्हणाला, "मी सुपरहिट 'अवतार' चित्रपटाचे शीर्षक दिले आहे. मी जेम्स कॅमेरॉनला सांगितले की चित्रपट चांगला होईल. हा चित्रपट पूर्ण व्हायला सात वर्षे लागतील हेदेखील मी त्याला सांगितले. मी असे म्हटल्यावर त्याला राग आला. मी सात वर्षात हा सिनेमा बनवू शकणार नाही हे तू खात्रीपूर्वक कसे सांगू शकतोस ? असे तो मला म्हणाला. तो ज्या प्रकारचा विचार करतोय ते शक्य नसल्याचे मी म्हटले होते. त्याने चित्रपटाचे नाव अवतार ठेवले असून दाखवले आहेत एलियन्स.''

एका टीव्ही शोमध्ये गोविंदा बोलत होता. त्याने 'देवदास' आणि 'ताल' हे चित्रपटही नाकारल्याचे सांगितले. अवतार चित्रपट न करण्याचे कारण त्याच्याकडे तारखा नव्हत्या असेही तो म्हणाला.

"कॅमेरॉनला वाटत होते की ४१० दिवसात शूटींग पूर्ण होईल. माझ्यासारख्याला अंगावर पूर्ण पेंटींग करणे पसंत नव्हते. त्यामुळे मी त्याची माफी मागितली. पण मी जसे म्हटले होते त्याप्रमाणे चित्रपट सुपरहिट ठरला. मला वाटते या चित्रपटासाठी त्याने ८-९ वर्षे शूटींग केले.", असेही गोविंदा म्हणाला.

Govinda claims he rejected 'Avatar'
गोविंदा म्हणतो 'अवतार'ची भूमिका नाकारली

गोविंदाच्या या मुलाखतीवर अनेक मीम्स बनले आहेत. त्यावर भरपूर मजेशीर कॉमेंट्स येत आहेत.

Govinda claims he rejected 'Avatar'
गोविंदा म्हणतो 'अवतार'ची भूमिका नाकारली

एका युजरने म्हटलंय, 'गोविंदाने म्हटले की त्याला अवतारची ऑफर होती., असं आहे की सलमान खानला फिजीक्ससाठी नोबेल पुरस्काराची ऑफर होती.'

Govinda claims he rejected 'Avatar'
गोविंदा म्हणतो 'अवतार'ची भूमिका नाकारली

आणखी एक युजर म्हणतो, 'गोविंदाला आर्यन मॅनचा रोल ऑफर झाला होता. आर्यन सूट फिट होत नसल्यामुळे त्याने तो चित्रपट नाकारला.'

Govinda claims he rejected 'Avatar'
गोविंदा म्हणतो 'अवतार'ची भूमिका नाकारली

काहीजणांनी तर गोविंदाच्या अनेक फनी मीम्स बनवत खिल्ली उडवली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.