ETV Bharat / sitara

'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ - pune news

या तरुणीने भेकराईला जाणारी पीएमपी बस अडवली आणि तिच्यासमोर डान्स केला.

'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ
author img

By

Published : Oct 3, 2019, 8:00 AM IST

Updated : Oct 3, 2019, 8:28 AM IST

पुणे - तरुणाईमध्ये सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली पाहायला मिळते. यातही 'टिकटॉक व्हिडिओ' क्रेझ मोठी आहे. बऱ्याच जणांना आपले टिकटॉक व्हिडिओ व्हायरल व्हावेत, असे वाटते. त्यासाठी ते कुठेही हे व्हिडिओ तयार करताना दिसतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणीने चक्क धावती पीएमपी बस थांबवून या गाडीसमोर डान्स केला आहे.

'चलो इश्क लडाये' या गाण्यावर तिने हा व्हिडिओ तयार केला आहे. हडपसर, गाडीतळ येथील हा व्हिडिओ असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या तरुणीने भेकराईला जाणारी पीएमपी बस अडवली आणि तिच्यासमोर डान्स केला. पीएमपीच्या चालकाला सुरुवातीला हा प्रकार काय आहे, ते समजलेच नाही. मात्र, जेव्हा ही तरुणी त्याला नाचताना दिसली तेव्हा तो पाहतच राहिला. या बसमध्ये इतरही प्रवासी होते.

'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ

हेही वाचा -'लाल कप्तान'चे आकर्षक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

टिकटॉक व्हिडिओ करणारी ही तरुणी नेमकी कोण, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, तिचा हा व्हिडिओ पाहून 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण पुन्हा एकदा सार्थ ठरते.

हेही वाचा -'चुलबूल पांडे' इझ बॅक, पाहा 'दबंग ३'मधील भाईजानची दमदार झलक

Intro:टिकटॉकवर व्हिडीओ तयार करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम राहिला नाही..या ऍपने तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे..पुण्यातील तरुणीचा टिकटॉक वर काढलेला एक व्हिडिओ सध्या असाच व्हायरल होतोय..या तरुणीने धावती पीएमपी बस थांबवून या गाडीसमोर डान्स केलाय..'चलो ईश्क लदाये' या गाण्यावर ही तरुणी थिरकताना दिसत आहे...Body:हडपसर, गाडीतळ येथील हा व्हिडीओ असल्याचे प्रथमदर्शनी दिसतेय..या तरुणीने भेकराईला जाणारी पीएमपी बस अडवली आणि तिच्यासमोर डान्स केलाय..पीएमपीच्या चालकाला सुरवातीला हा प्रकार काय आहे ते कळालेच नाही...पण जेव्हा ही तरुणी त्याला नाचताना दिसली तेव्हा तो पाहतच राहिला..या बसमध्ये इतरही प्रवाशी होते..ही तरुणी कोण अद्याप नाही कळू शकले...Conclusion:...
Last Updated : Oct 3, 2019, 8:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.