हैदराबाद - ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी)च्या प्रवर्तन दक्षता मंडळाने मंगळवारी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना आगामी चित्रपटाचे पोस्टर शासकीय मालमत्तेवर लावल्यामुळे ४००० रुपये दंड ठोठावला आहे.
या बॉलिवूड निर्माता दिग्दर्शकाने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत शासकीय मालमत्तेवर पोस्टर लावल्याचा आरोप केला आहे.
"राम गोपाल वर्मा यांना अनधिकृतपणे भिंतीवर पोस्टर चिकटवून उल्लंघन केल्याबद्दल जीएचएमसी कायदा १९५५ अंतर्गत ४०२, ४२१ यासह ६७४,५९६, ४८७ या कलमाखाली ४००० रुपयांचा दंड केला आहे,'' असे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) च्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - सुशांतसिंगच्या कंपन्यांमध्ये रिया आणि तिच्या भावाने अनियमितता केल्याची शक्यता -बिहार पोलिसांचा तपास
वयैक्तिक अॅपवर रिलीज करण्यात आलेल्या राम गोपाल वर्माच्या या चित्रपटाचे प्रमोशन शासकिय भिंतीवर केल्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिक माहितीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.