मुंबई - 'कलंक' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात वरूण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता चित्रपटातील पहिलं गाणंही प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
या गाण्याची एक झलक शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सोमवारी चित्रपटातील 'घर मोरे परदेसीया' हे गाणं प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्श यांनी केलेल्या या व्हिडिओमध्ये वरूणची आणि आलियाची झलकही पाहायला मिळत आहे. मात्र, ती पाठमोरीच.
#Kalank first song out tomorrow [Mon] at 11 am... A glimpse of the song #GharMorePardesiya... Directed by Abhishek Varman... 17 April 2019 release. pic.twitter.com/54NBrkzvmr
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Kalank first song out tomorrow [Mon] at 11 am... A glimpse of the song #GharMorePardesiya... Directed by Abhishek Varman... 17 April 2019 release. pic.twitter.com/54NBrkzvmr
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2019#Kalank first song out tomorrow [Mon] at 11 am... A glimpse of the song #GharMorePardesiya... Directed by Abhishek Varman... 17 April 2019 release. pic.twitter.com/54NBrkzvmr
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2019
उद्या हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिषेक वर्मन यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.