मुंबई - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर डान्सर्सची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या डान्सर्सला त्यांनी नव्या वेतन आयोगाप्रमाणे मानधन दिले नसल्याचे या डान्सर्सनी म्हटले आहे.
'फेडरेशन ऑफ सिने आर्टिस्ट असोसिएशन'च्या डान्सर्सनी गणेश आचार्यंवर हा आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं, की '२०१४ साली 'किक' चित्रपटातील गाण्यादरम्यान आम्हाला पगार देण्यात आला होता. तेव्हापासून आमच्या पगारात वाढ करण्यात आली नाही. त्यावेळी ३५०० रुपये इतके वेतन देण्यात आले होते. त्यानंतर इतर डान्सर्सचा ४००० रुपयांपर्यंत रेट वाढवण्यात आला असूनही आमचं वेतन वाढवण्यात आलेलं नाही. ५ वर्षांपासून आमचं वेतन वाढवलं नाही, असेही या डान्सर्सनी सांगितलं आहे.
हेही वाचा -आदित्य ठाकरेंविरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात
पुढे ते म्हणाले, 'आम्ही सर्वांनी इतर कोरिओग्राफर्सकडे जाऊन याबद्दल बोलणीही केली. त्यानुसार इतर कोरिओग्राफर्सनी डान्सर्सचा रेट ४५०० रुपये केला आहे. मात्र, गणेश आचार्य यांनी अजुन हा रेट वाढवला नाही.
सर्व डान्सर्सनी गणेश आचार्य यांना रेट वाढवण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -'सरदार उधम सिंग'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलची सुवर्णमंदिराला भेट