मुंबई - मराठी सिनेसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून आतुरता आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. मात्र, प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच हा चित्रपट वादाच्या कचाट्यात अडकला आहे. कॉपीराईटचं उल्लंघन केल्याबद्दल 'झुंड'चे निर्माते आणि अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
कुमार नावाच्या फिल्ममेकरने नागराज मंजुळे आणि कृष्ण कुमार, टी सीरीजचे प्रबंध अधिकारी भूषण कुमार, अमिताभ बच्चन आणि ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे असे विजय बरसे यांना ही नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा -'नाळ' नंतर तेलुगू चित्रपटात झळकणार 'चैत्या', पाहा पोस्टर
कुमार यांच्या या नोटीसला टीसीरिज कडून उत्तरही देण्यात आले. मात्र, हे अद्याप अस्पष्ट आहे.
आपल्या नोटीसमध्ये कुमार यांनी म्हटलं आहे, की 'चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाचा आधार घ्यावा लागला. चित्रपटाचं स्क्रिनिंग थांबवण्यात यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -'मिर्झापूर २' लवकरच येणार, पंकज त्रिपाठींनी दिली हिंट
कुमार हे एक शॉर्ट फिल्ममेकर आहेत. त्यांनी २०१७ साली अखिलेश पॉल यांच्या जीवनावर आधारित एक शॉर्ट फिल्म तयार करण्याचे हक्क मिळवले होते. अखिलेश हे एक फूटबॉलपटू आहेत. फूटबॉलमुळे त्यांचे आयुष्य कशाप्रकारे कलाटणी घेते, याची कथा दाखवण्यासाठी कुमार यांनी चित्रपट तयार करण्याचं ठरवलं होतं.
त्यांनी ११ जून २०१८ साली या चित्रपटाची कथा आणि स्क्रिप्टचं पंजीकरण तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशन मध्ये केले होते.
मात्र, नागराज मंजुळे, अमिताभ बच्चन आणि 'झुंड'च्या निर्मात्यांनी या कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केले आहे, असे कुमार यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -'टायटॅनिक'मध्ये रोझ जॅकला वाचवू शकली असती? सेलिन डियोनने दिलं उत्तर