मुंबई - बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर नववर्षात नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत तो 'तुफान' चित्रपटाची मागच्या वर्षापासून तयारी करत आहे. त्यामुळे यावर्षी तो 'बॉक्सर'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. फरहानने हा फोटो शेअर करून चाहत्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'भाग मिल्खा भाग' या चित्रपटानंतर राकेश मेहरा यांनी 'तुफान' चित्रपटासाठी फरहान अख्तरची निवड केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्या शरीरयष्टीवरही मेहनत घेण्यात आली आहे. फरहानचा फर्स्ट लूक पाहून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज लावता येतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -प्रियंका चोप्राने शेअर केला २०१९ च्या काही संस्मरणीय आठवणींचा व्हिडिओ
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. या चित्रपटातील भूमिकेबाबत तो म्हणाला होता, की 'तुफान हा चित्रपट फक्त बॉक्सिंग नाही. हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक भाग आहे. 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाप्रमाणेच 'तुफान' हा चित्रपटही आपलीच एक कथा सांगतो. कोणत्याही भावनिक कथेला खऱ्या आयुष्यातील काही भागाची झालर असते. त्यामुळे हा चित्रपट माझ्या आयुष्याच्या फार जवळचा आहे'.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
परेश रावल आणि मृणाल ठाकूर यांची देखील या चित्रपटात मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. यावर्षी २ ऑक्टोबर 'गांधी जयंती'च्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील येईल.
हेही वाचा -आपल्या चाहत्यांसोबत विद्या बालने 'असा' साजरा केला वाढदिवस