मुंबई - नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स', लस्ट स्टोरीज आणि 'द रिमिक्स' या वेबसीरिजला आतंराष्ट्रीय 'एमी अवार्ड्स २०१९' साठी विविध श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.
सेक्रेड गेम्सला ड्रामा सीरिजमध्ये एका श्रेणीमध्ये तर लस्ट स्टोरीजला दोन नामांकन मिळाले आहेत.
अभिनेत्री राधिका आपटे हिला लस्ट स्टोरीजमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
भारतीय वेब टेलीव्हिजन श्रेणीमध्ये 'द रीमिक्स' या वेबसीरिजला 'इंटरनॅशनल अॅकडमी ऑफ टेलीव्हिजन आर्ट्स अँड सायंसेस' यांच्याकडून नामांकन मिळाले आहे.
हेही वाचा-'रॉमकॉम' सिनेमाचे अनोखे थ्रीडी पोस्टर सोशल मीडियावर लाँच
११ श्रेणींसाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये २१ देशांच्या ४४ व्यक्तींचा समावेश आहे. अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, भारत, इझ्राईल, नेदरलँड, पोर्तुगाल, कतर, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनायटेड किंगडम आणि संयुक्त राज्य अमेरिका या देशांचा समावेश आहे.
२५ नोव्हेंबरला हिल्टन न्यूयॉर्क येथे विजेतांची नावे जाहीर करण्यात येतील.
हेही वाचा-पाहा, 'शुभमंगल ज्यादा सावधान'च्या इरसाल फॅमिलीची खुमासदार झलक