मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या मक्कल निधी मायेम या पक्षाला बॅटरी टॉर्च हे निवडणूक चिन्ह बहाल केलंय. पक्षातर्फे या चिन्हाचे स्वागत केलं जातंय.
कमल हासन यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. आगामी निवडणुकीसाठी आयोगाने आमच्या एमएनएम पक्षाला बॉटरी टॉर्च हे चिन्ह दिले आहे. हे चिन्हा आमच्यासाठी अतिशय योग्य आहे. तामिळनाडू आणि देशाच्या नव्या राजकारणाला हे चिन्ह दिशा देईल, अशा आशयाचे मत त्यांनी व्यक्त केलंय.
मक्कल निधी मायेम या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बॉटरी टॉर्च या चिन्हामुळे अंधारातून सत्यापर्यंत पोहोचता येईल हा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये तयार होतोय.