ETV Bharat / sitara

New Marathi Show : 'हे तर काहीच नाय' मध्ये सिद्धार्थ जाधव पर्मनंट गेस्ट! - new marathi show

झी मराठीवर नुकताच सुरु झालेला ‘हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nahi) हा विनोदी कार्यक्रम सुरू होत आहे. यात अभिनेता सिद्धार्थ जाधव (Actor Siddharth Jadhav) गेस्टच्या भूमिकेत असेल.

Siddharth Jadhav
Siddharth Jadhav
author img

By

Published : Dec 12, 2021, 8:11 PM IST

मुंबई - विनोदाने मन हलके होते आणि त्यामुळेच कॉमेडी शोज ना प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळतोय. विनोद निखळ असेल तर त्या कार्यक्रमाला टीआरपी उत्तम मिळतो आणि म्हणूनच प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी विनोदी कार्यक्रम सुरु आहे. झी मराठीवर नुकताच सुरु झालेला ‘हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nahi) हा त्यातीलच एक.

Siddharth Jadhav
सिद्धार्थ जाधव पर्मनंट गेस्ट!
झी मराठी आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी नेहमीच सज्ज असते म्हणूनच आता झी मराठीने आपली कंबर पुन्हा कसली आहे आणि ‘हे तर काहीच नाय' या नवीन विनोदी स्टॅन्डअप कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना हसवण्याचा विडा देखील उचलला आहे.
येथे कलाकार आपल्या आयुष्यातील काही मजेशीर किस्स्यांचा फड रंगवून प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. स्टॅन्ड-अप कॉमेडीचं स्वरूप असलेल्या या कार्यक्रमाला मनोरंजनाचा चार चांद जोडण्यासाठी मराठी कलाविश्वातील ऑल टाईम आवडता आणि दिलखुलास अभिनेता सिद्धार्थ जाधव विशेष अतिथीच्या भूमिकेत दिसणार असून तो या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोड मध्ये प्रेक्षकांसोबत असणार आहे. तसेच त्याच्या साथीला असणार आहे सैराट फेम तानाजी गलगुंड. हा कार्यक्रम डॉ. निलेश साबळे दिग्दर्शित असल्याकारणाने मनोरंजनाची तुफान मस्ती होणारच यात काही शंका नाही.

हेही वाचा - HBD Superstar Rajinikanth : हरभजनने रजनीकांत यांचा कोरला हुबेहुब टॅट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.