मुंबई - अभिनेत्री दिव्या दत्ताला बालपणात अमिताभ बच्चनसारखे व्हायचे होते. यासाठी ती बच्चनसारखा गेटअपही करायची. त्यांच्या स्टाईलमध्ये नाचही करायची. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना दिव्याने याचा खुलासा केला आहे.
दिव्या म्हणाली, "मला आठवतेय की मी 'खाईके पान बनारस वाला' यासह अमिताभ बच्चन यांच्या बऱ्याच गाण्यांवर नृत्य करायचे. माझी आई डॉक्टर होती. तेव्हा त्यांचे मित्र घरी यायचे तेव्हा मी त्यांच्याजवळ जायचे आणि म्हणायचे, की मी तुम्हाला डान्स करुन दाखवते. काकू खूश व्हायच्या, टाळ्या वाजवायच्या आणि मला गुलाब जामून द्यायच्या. मी बच्चनसाहेबांसारखा गेटअपही ठेवायचे.
ती पुढे म्हणाली, "मला बच्चन साहेबंसारखे बनायचे होते. वर्गात ती सर्वात अधिक लोकप्रिय होते. आई डॉक्टर असल्यामुळे लहानपणी शिक्षण आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. मी आनंदाने शिक्षण आणि डान्स करीत असे. मी रेडक्रॉससाठी जपानमध्ये अभिनय आणि नृत्यासाठी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.''
दिव्या जसजशी मोठी होत गेली तसतसे तिच्यावर सिनेमाचा प्रभावही वाढत गेला.
याबद्दल ती म्हणते, "मला चित्रपटांची आवड होती. एकदा मला टॅलेंट हंट शोमध्ये निवडले गेले होते. जेव्हा मी मुंबईला गेले होते, तेव्हा आईन मला म्हणाली होती की तू अयशस्वी झालीस तरी मी तुझ्याबरोबर आहे. मला असे वाटते की, प्रत्येक मुलीला भरारी घेण्यासाठी असे आश्वासन हवे असते. "
दिव्याला २०१७मध्ये आलेल्या 'इरादा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.