मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'मलंग' चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा तिने या चित्रपटातील बिचवरचा लुक शेअर केला आहे.
'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर हा सप्सेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. यामध्ये दिशा पटानीसोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमु यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या जीवावर उठलेलं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे नेमका कोण कोणाचा शत्रु आहे, याचे रहस्य या चित्रपटात दडलेले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर दिशाच्या बोल्डनेसचीही सोशल मीडियावर चर्चा झाली. तिचे पात्र हे प्रेक्षकांना अधिक कोड्यात टाकणारे आहे. त्यामुळे तिची या चित्रपटात नेमकी काय भूमिका आहे, हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर समजेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -आयुष्मान खुरानाची पुन्हा धमाल, पाहा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा ट्रेलर
त्यापूर्वी तिने शेअर केलेल्या बिकनी लुकवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. २ लाखापेक्षा अधिक लाईक या फोटोवर मिळाले आहेत.
दिशा आणि आदित्यवर चित्रीत झालेलं 'मलंग'चं शिर्षक गाणंदेखील प्रदर्शित झालं आहे. वेद शर्माने हे गाणं गायलं आहे. तसेच त्याने हे गाणं कंपोझही केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मोहित सुरीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'मलंग' ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -हिना खानचा ग्लॅमरस अवतार असलेला 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित