हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांना कोरोनाची लागण होत असताना मराठी चित्रपटसृष्टीही त्यातून सुटली नाही. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला करोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपण कोरोना बाधित असल्याची माहिती दिली आहे.
प्रियदर्शन जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणाला आहे, ” मी सर्वांना कळवू इच्छितो की सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी कोरोनाचे सर्व नियम पाळत आहे. योग्य उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी ही विनंती , काळजी घ्या. ” अशी पोस्ट करत प्रियदर्शनने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
प्रियदर्शन जाधव सध्या ‘लव्ह सुलभ’ या सिनेमात काम करत होता. या सिनेमात प्रियदर्शन लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे. प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे कलाकार या सिनेमात आहे.
बॉलीवूडमधील कालाकारांनाही कोरोनाची लागण
विकी कौशल, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि आता गोविंदा या कलाकारांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. वरील सर्व कलाकार सध्या घरीच विलगीकरणात आहेत.