मुंबई - सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी राजकारण हा विषय सर्वांच्याच जवळचा असतो. यंदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून झालेले राजकारण सर्वांनाच ठावुक आहे. राजकीय समीकरणं हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेर असतात. त्यामुळेच राजकारणात कधी काय होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अशाच आशयावर आधारित असलेला 'धुरळा' हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात येऊन धडकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
#पुन्हानिवडणूक या हॅशटॅगमुळे 'धुरळा' चित्रपटाबाबत आधीच फार चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर #पुन्हानिवडणूक यामागचं कारण प्रेक्षकांना समजले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यातील कलाकारांनी हा हटके फंडा वापरला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे त्यांचा हटके लूकदेखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आले आहेत.
- View this post on Instagram
आपली नुसती हव्वाच नाई तर धूर पण लै असतो! @oakprasad तुमचा धुरळा पण दाखवा की! #धुरळा | #Dhurala #3Jan
">
अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ हे कलाकार यामध्ये भूमिका साकारत आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून क्षितीज पटवर्धनने या सिनेमाचं लेखन केलं आहे. ३ जानेवारी २०२० रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.
- View this post on Instagram
Some happy moments for our trailer launch ! नाद करा, पन आमचा कुठं ?! #dhurala #traileroutnow
">