मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या 'छपाक'ची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलिकडेच दीपिकाने एक खास संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणींवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -रितेश - जेनेलियाचा क्युट अंदाज, व्हिडिओ व्हायरल
दीपिकाने हा व्हिडिओ शेअर करून 'बदलाव की नींव शुरुवात होती है, बदलना है', असे कॅप्शन दिले आहे.
१० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा -डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न