मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वर्षाच्या सुरुवातीलाच 'छपाक' चित्रपट प्रदर्शित झाला. अॅसिड हल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. मात्र, चित्रपटापेक्षा दीपिका पदुकोण जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी गेली, हे प्रकरण अधिक गाजले. सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकाही करण्यात आल्या. या सर्व गोष्टींमुळे IMDb मध्ये 'छपाक' चित्रपटाला कमी रेटिंग मिळाली आहे.
-
Deepika’s comment to all Bhakts and fascists downvoting Chhapaak - “ Unho ne meri IMDB rating badli hai, mera mann nahi “ 😂😂🔥 you go girl @deepikapadukone pic.twitter.com/Grvpiaub2G
— ria (@MonaDarlingx) January 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Deepika’s comment to all Bhakts and fascists downvoting Chhapaak - “ Unho ne meri IMDB rating badli hai, mera mann nahi “ 😂😂🔥 you go girl @deepikapadukone pic.twitter.com/Grvpiaub2G
— ria (@MonaDarlingx) January 29, 2020Deepika’s comment to all Bhakts and fascists downvoting Chhapaak - “ Unho ne meri IMDB rating badli hai, mera mann nahi “ 😂😂🔥 you go girl @deepikapadukone pic.twitter.com/Grvpiaub2G
— ria (@MonaDarlingx) January 29, 2020
दीपिकाने याबाबत एक स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तिचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती म्हणते, की 'त्यांनी माझी IMDb रेटिंग बदलली आहे, माझं मन नाही'.
IMDb रेटिंगमध्ये दीपिकाच्या 'छपाक'ला फक्त ४.६ स्टार्स मिळाले आहेत.
हेही वाचा -'मुबारक हो टुकडे टुकडे भाजप', जामिया गोळीबारावर अनुराग कश्यपची तीव्र प्रतिक्रिया
जेएनयू येथे हिंसेविरोधात प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दीपिका पदुकोणने पाठिंबा दिला होता. त्यासाठी तिने ७ जानेवारीला कँपसमध्ये हजेरी लावली होती. ज्यावेळी ती जेएनयूमध्ये पोहचली होती, त्यावेळी कन्हैय्या कुमार भाषण देत होता. त्यानंतर दीपिकाच्या विरोधात बॉयकॉट दीपिका, बॉयकॉट छपाक यांसारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड झाले.
दीपिकाच्या जेएनयू भेटीचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनावरही उमटले. १० जानेवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास ३४ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
अलिकडेच आता तिने तिच्या आगामी 'द इंटर्न' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती ऋषी कपूर यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.
हेही वाचा -विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटाचा हॉरर टीझर, पाहा व्हिडिओ