पणजी (गोवा) - 'कमिटमेंट’ हा चित्रपट अस्मितेबाबतची दुविधा, आधुनिक आई व्हावे की परंपरागत माता यातील संघर्षाचे चित्रण आहे. सिनेमा ही एक वैयक्तिक कला आहे. माझ्या चित्रपटाची कल्पना माझ्या अनुभवातून आणि भावनेतून निर्माण झाली, असे मत तुर्क दिग्दर्शक सेमिह काप्लानोग्लू यांनी 'ईफ्फी'मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तुर्कस्तान हा पूर्व आणि पश्चिमेच्या संगमावर उभा असलेला देश आहे. तिथे अस्मितेचा प्रश्न हा नेहमी उंबरठ्यावर असतो. ओरहान पामुक सारख्या लेखकालाही तो हाताळायचा असतो. भारत आणि तुर्कस्तान सारख्या देशांमध्ये हा संस्कृती संघर्ष सर्जनाच्या प्रक्रियेला संवेदनशील बनवतो, असेही ते म्हणाले. ‘कमिटमेंट’ हा ऑस्करसाठी तुर्कस्तानचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी यंदा निवडलेला चित्रपट आहे.
-
#IFFI50
— IFFI 2019 (@IFFIGoa) November 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
'Commitment' movie director @SemihKaplanogl and actresses @kubrakip and Ece Yüksel along with the director of 'Coda' Claude Lalonde are here to interact with the press at #IFFI2019. pic.twitter.com/fAf2voHx2k
">#IFFI50
— IFFI 2019 (@IFFIGoa) November 22, 2019
'Commitment' movie director @SemihKaplanogl and actresses @kubrakip and Ece Yüksel along with the director of 'Coda' Claude Lalonde are here to interact with the press at #IFFI2019. pic.twitter.com/fAf2voHx2k#IFFI50
— IFFI 2019 (@IFFIGoa) November 22, 2019
'Commitment' movie director @SemihKaplanogl and actresses @kubrakip and Ece Yüksel along with the director of 'Coda' Claude Lalonde are here to interact with the press at #IFFI2019. pic.twitter.com/fAf2voHx2k
हेही वाचा -IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना
'कोडा' या कॅनेडियन चित्रपटाचे दिग्दर्शक क्लॉड लालोंदे यांनीही या पत्रपरिषदेत आपले अनुभव मांडले. त्यांचा चित्रपट एका प्रख्यात पिआनो वादकाच्या आत्मीय संघर्षाची कथा सांगतो. ईफ्फीच्या जागतिक प्रिमियर विभागात तो आज झळकला.
-
Satyajit Ray is a very important Director for me. I feel inspired by his films: @SemihKaplanogl, Director of Turkish film Commitment (Baglilik Asli) at #IFFI2019 pic.twitter.com/LL8Z64Emhe
— PIB in Goa (@PIB_Panaji) November 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Satyajit Ray is a very important Director for me. I feel inspired by his films: @SemihKaplanogl, Director of Turkish film Commitment (Baglilik Asli) at #IFFI2019 pic.twitter.com/LL8Z64Emhe
— PIB in Goa (@PIB_Panaji) November 22, 2019Satyajit Ray is a very important Director for me. I feel inspired by his films: @SemihKaplanogl, Director of Turkish film Commitment (Baglilik Asli) at #IFFI2019 pic.twitter.com/LL8Z64Emhe
— PIB in Goa (@PIB_Panaji) November 22, 2019
आपण जेव्हा गर्तेत असतो तेव्हा त्याच्या निराकरणाची कळ आपल्या व्यक्तीमत्वातच कुठेतरी असते, हा अनुभव या चित्रपटात उभारला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु असा चित्रपट लिहायला एखाद्या वर्षाइतका अवधीही लागू शकतो, असे ते म्हणाले. 'कोडा' हा चित्रपट वार्धक्य, संगीत, डिप्रेशन या विषयाशी निगडीत आहे.
हेही वाचा -IFFI 50 : राजकारण आणि धर्मांधतेमुळ निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर - गोरान पास्कल्जेविक