पणजी (गोवा) - ईफ्फीच्या सुवर्णमहोत्सवाला २० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. यंदा ईफ्फीचे ५० वे वर्ष असल्यामुळे हा महोत्सव अतिशय आकर्षक सजावटीने सजला आहे. लहान मुलांनाही या महोत्सवाचा आस्वाद घेता यावा, यासाठी परिसरात 'चिल्ड्रन व्हिलेज' तयार करण्यात आले आहे. यामध्ये चित्रपटासोबतच लहान मुलांना गीतसंगीताचा आनंद घेता येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या 'चिल्ड्रन व्हिलेजचे' उद्घाटन केले.
हेही वाचा -IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना
विद्युतरोषणाईने उजळलेल्या महावीर उद्यानात मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी तंबुतील चित्रपटगृह, नृत्य आणि चित्रपटातील व्यक्तीचित्रे यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचा आनंद घेता येणार आहे. उद्यानाच्या समोर गोवा कॉलेज ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी जंगलबूकमधील वन्यजीव, बाहुबलीमधील सिंहासन, कलाकारांची तैलचित्रे, तसेच स्पायडरमॅन यांसारख्या कलाकृती तयार केल्या आहेत.
मुलांचे मनोरंजन होईल, असे उपक्रम येथे राबविले जाणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच, गोवा कॉलेज ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे त्यांनी कौतुक केले.
हेही वाचा -गोव्यातील ५० व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलची रंगारंग सुरुवात