मुंबई - प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या लिखानाचे अनेक चाहते आहेत. बेस्ट सेलर म्हणून त्याच्या पुस्तकांना प्रसिद्धीही मिळते. मोठ्या प्रमाणात त्याच्या पुस्तकांना मागणीही असते. त्यामुळे रस्त्यावरही या पुस्तकांच्या नकली प्रती मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. मात्र, स्वत:चेच पुस्तक रस्त्यावर मिळत असेल तर.... असाच अनुभव चेतन भगतलाही आला.
-
This guy sold me my own book !😂 His reaction when he found out was so sweet. ♥️. I don’t support piracy (hurts me directly) but I also know it helps people like him make a living. I’d rather they sold original books at signals instead. Many do now! pic.twitter.com/UEK4gfqxVH
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This guy sold me my own book !😂 His reaction when he found out was so sweet. ♥️. I don’t support piracy (hurts me directly) but I also know it helps people like him make a living. I’d rather they sold original books at signals instead. Many do now! pic.twitter.com/UEK4gfqxVH
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) August 7, 2019This guy sold me my own book !😂 His reaction when he found out was so sweet. ♥️. I don’t support piracy (hurts me directly) but I also know it helps people like him make a living. I’d rather they sold original books at signals instead. Many do now! pic.twitter.com/UEK4gfqxVH
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) August 7, 2019
चेतन भगतने त्याला आलेला हा अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे. चेतन भगतची कार रस्त्यावर थांबलेली असताना रस्त्यावर पुस्तक विक्री करणारा मुलगा त्याच्याजवळ येतो. पुढे चेतन भगत त्याला त्याचेच पुस्तक आहे का, असे विचारतो. तेव्हा तो मुलगा त्याच्याजवळचे 'चेतन भगत' हे पुस्तक चेतन भगतला देतो.
तो मुलगा चेतन यांना त्यांच्याच पुस्तकाची प्रशंसा करताना दिसतो. मात्र, जेव्हा चेतन भगत त्याला स्वत:ची ओळख सांगतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे होतात.