मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या 'मिशन मंगल' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट यावर्षीच १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, याच दिवशी प्रभासचा 'साहो' चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'मिशन मंगल' आणि 'साहो' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे चित्रपट निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
'मिशन मंगल' चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नु, नित्या मेनन, क्रिती कुल्हारी आणि शर्मन जोशी हे कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती हे करत आहेत.
![Box Office Clash Between Akshay Kumar And Prabhas](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3554640_mission.jpg)
तर, 'साहो' चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा अलिकडेच टीजर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना या चित्रपटाचीदेखील उत्सुकता आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य दिनी दोन्हीही बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर चुरस रंगताना दिसणार आहे.